सुविधा
जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत बाजार समितीच्या सायखेडा उपबाजार आवारावर पायाभुत सुविधा निर्माण करणेत आलेली आहे. त्यामध्ये कांडा लिलावासाठी शेड, अंतर्गत रस्ते, टॉयलेट ब्लॉक, पाणी वाहून जनतेसाठी गटारी इत्यादी कामे आहेत. सदरच्या कामावर रुपये १,४८,९८,६३२/- इतका खर्च झालेला आहे. सदर विकास बांधकामासाठी ६४,८६,५६९/- इतके अनुदान मिळालेले आहे. तसेच जनावरे बाजारमधील पायाभुत सुविधा निर्माण करणे, गुरांच्या लिलावासाठी शेड बांधकाम करणे अंतर्गत रस्ते, जनावरे डॉक्टर दवाखाना शे याकामवार रुपये १,०९,५३,५३२/- इतका खर्च झालेला आहे. सदर विकास बांधकामासाठी १,००,००,०००/- इतके अनुदान मिळालेले आहे. असे एकूण १,६४,८६,५६९/- इतके अनुदान मिळालेले आहे.
मा. पणन संचालक सो, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्ल्याकडून सदर बांधकामांस कलाम १२(१) ची मान्यता मिळालेली आहे व MACP प्रकल्पाअंतर्गत विविध विकास बांधकामे खालीलप्रमाणे पूर्ण झालेली आहेत.
बांधकामाचे नाव अ) जनावरे बाजार :- १) जनावरे शेड २) अंतर्गत रस्ते ३) जनावरे डॉक्टर शेड आणि ट्रायसेस ब) पायाभुत सुविधा :- १) सेल हॉल २) अंतर्गत रस्ते ३) स्वच्छता गृह