कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत

बाजार क्षेत्र-

     महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-१ पुरवणी दिनांक २८.१२.१९९५ रोजी झालेल्या राजपत्रानुसार दि.२८.१२.१९९५ पासून लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन निफाड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत व कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगांव अशा दोन बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या व दि.२८.१२.१९९५ पासुन पिंपळगांव बसवंत बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे ६९ गावांचे झालेले आहे.


बाजार आवारे -

     बाजार समितीचे मुख्य बाजार आवार पिंपळगांव बसवंत असुन उपबाजार सायखेडा, ओझर, पालखेड व कसबे सुकेणे आहे. स्वमालकीचे आजमितीस मुख्य व उपबाजार आवारांसह एकूण ५८ हेक्टर (१४५ एकर) एवढे मोठे क्षेत्र असलेली नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील एकमेव बाजार समिती आहे.

मुख्य बाजार आवार:          (अ) मा.शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवार, पिंपळगाव बसवंत(क्षेत्र ४० हे.)पिंपळगांव बसवंत
                                         (ब) डाळींब व बेदाणा बाजार आवार(क्षेत्र ०४ हे. २० आर.)      (क) भाजीपाला मार्केट (क्षेत्र ०२ हे. ६८ आर.)
दुय्यम बाजार आवार:         (अ) सायखेडा (क्षेत्र ०५ हे. १० आर.)                                    (ब) ओझर मिग(क्षेत्र ०२ हे. २४ आर.)
                                         (क) पालखेड(क्षेत्र ०१ हे. ७३ आर.)                                      (ड) कसबे सुकेणे (क्षेत्र ०२ हे. ०० आर.)
तात्पुरते खरेदी विक्री केंद्र:  दि. ०१/०२/२००४ पासून शिरवडे वणी येथे प्रायोगिक तत्वावर द्राक्षमणी लिलावासाठी निर्माण केले.