बाजार समितीने कार्यक्षेत्रात सामाजिक दृष्टिकोन ठेवून केलेल्या सेवाभावी कार्याचा आढावा
दिनांक ०१ मे २०१६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्ये साधून माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या शुभहस्ते निफाड
तालुक्यातील खालीलप्रमाणे १० आत्महत्याग्रस्थ शेतकरी बांधवांचे कुटुंबियांना बाजार समितेचे माफत आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी रुपये २५०००/- रकमेचा धनादेश वाटप करणेत आले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत या संस्थेमार्फत निफाड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या परिवारास आर्थिक मदत म्हणुन दिनांक २६ जानेवारी २०१९ रोजी गणराज्य दिनाचे औचित्य साधून निफाड तालुक्यातील १२ आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांचे कुटुंबियांना बाजार समितीचे मार्फत आर्थिक मदत म्हणुन रुपये २५,०००/- रक्कमेचा धनादेश वाटप करणेत आले तसेच बाजार आवारावर अपघात झालेल्या अपघातग्रस्त शेतकरी बांधवांचे कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणुन रुपये १,००,०००/- रक्कमेचा धनादेश वाटप करणेत आला
दुष्काळी परिस्थितीत बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक कामांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत योगदान असावे असा उदात्त हेतू ठेवून बाजार समितीने रुपये २३ लाख ८६ हजार इतक्या रकमेचे जे. सी. बी. मशीन घेऊन अत्यल्प दारात व शेतकऱयांचा शेतीमाल बाजारपेठेत ने-आण करणेसाठी व्यवस्थित रस्ते करणे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, पिण्याचे पाण्याचे सार्वजनिक गावातळे करणे, सार्वजनिक रस्ते, इ. कामासाठी खालीलप्रमाणे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांना उपलब्ध करून दिले आहे.
बाजार समितीने शेतकरी बांधवांच्या हितासाठी भविष्यात दुष्काळ परिस्थितीस सामोरे जाणेकरिता स्वनिधीतून ०१ कोटी लिटर पाणी क्षमतेचे शेततळ्यांची उभारणी केलेली असून त्यासाठी रक्कम रुपये ०६ लाख ७४ हजार एवढा खर्च झालेला आहे. तसेच चिंचखेड शिवारात व मुख्य बाजार आवरावर विहिरीचे काम केलेले आहे.
बाजार समितीकडे असलेले ५ टँकर व ५ ट्रॅक्टरद्वारे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची सुविधा करणेसाठी ट्रॅक्टर व टँकरद्वारे कार्यक्षेत्रातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवार पिंपळगांव बसवंत येथील जॉईन्ट फॉर्मिंग सोसायटीकडून रुपये ४,३८,७५०/- किंमतीच्या १३५० गाठी चारा खरेदी करून तालुक्यातील दुष्काळग्रस्त गांवातील जनावरांना चारा उपलब्ध करून दिला आहे.
पिंपळगांव बसवंत बाजार समितीच्या परिसरात असलेल्या गो शाळेतील जनावरांसाठी बाजार समितीने मोफत गावात साठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच गो शाळेतील जनावरांसाठी बाजार समितीमार्फत ट्रॅक्टर व टँकरद्वारे पाण्याची उपलब्ध करून देत आहे.
जलयुक्त शिवार अभियानात शासनाच्या एक पाऊल पुढे टाकत सन २०१४-२०१५ पासून निफाड तालुक्यातील ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी असलेल्या भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर, तळवाडे, पिंपळगाव निपाणी या गावांमध्ये नदी, नाले, गावतळे आदींचे खोलीकरण व रुंदीकरण केलेले असून त्याचा फायदाही शेतकऱ्यांना या वर्षाच्या दुष्कळात झालेला आहे. त्याबाबत वृत्तपत्रे कात्रण व प्रत्यक्ष काम करतानाचे फोटो खालीलप्रमाणे आहे. तसेच चालू वर्षी तालुक्यातील १३५ गावांपैकी १०३ गावामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे. त्यांपैकी फक्त १२ गावे जलयुक्त शिवार अभियानात सावविष्ट आहे. उर्वरित गावांमध्ये बाजार समितीच्या माध्यमातून नदी, नाले, बंधारे, गावातले आदींचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरु आहे. बाजार समितीने शासनाच्या जलशिवार अभियानात सहभाग घेतल्याने मा. उपअभियंता सो. जिल्हा परिषद नाशिक व मा. गटविकास अधिकारी सो. व मा. तहसीलदार सो. निफाड यांनी बाजार समितीस पात्र देऊन विशेष आभार मानलेले आहेत.
बाजार समितीने कार्यक्षेत्रातील व बाजार समितीच्या परिसरातील रुग्णांची सेवा व्हावी या उद्देशाने पिंपळगांव बसवंत व सायखेडा परिसरात एक रुग्णवाहिका ना नफा ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध करून दिली जात आहे
बाजार समितीने कार्यक्षेत्रातील व बाजार समितीच्या परिसरातील जनतेची सेवा व्हावी या उद्देशाने सायखेडा परिसरात एक वैकुंठरथ ना नफा ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध करून दिली जात आहे.
पणन मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या क्रेटस अनुदान योजनेचा कार्यक्षेत्रात पुरेशा प्रमाणात प्रचार व प्रसार करून सदर योजनेअंतर्गत अनुदान मिळणेकामी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ६१५ शेजाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांपैकी संपूर्ण ६१५ शेतकऱयांच्या प्रस्तावास पणन मंडळाकडून तत्वतः मान्यता मिळाली असून सदर ६१५ लाभार्थी शेतकऱ्यांना रु. ३२,९२,३२५/- रकमेच्या धनादेशांचे वाटप करण्यात आलेले आहे.
बाजार समितीने कार्यक्षेत्रात सामाजिक दृष्टिकोन ठेवून केलेल्या सेवाभावी कार्याचा आढावा